जिल्ह्यातील ५९ गावातील ७ हजार हेक्टर शेतजमीन भुसपांदनातून मुक्त

0
8

जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांची माहिती
गोंदिया,दि.५ -प्रकल्प निर्र्मितीसाठी शासनाकडून जमिनीचे भूसंपादन करण्यात येते. परंतु प्रकल्पपूर्ण होऊन अनेक दिवस झाल्यानंतरही भूसंपादन झालेल्या जमिनीचे निर्बंध कायम असल्याने तेथील शेतकèयांना त्याचा त्रास सहन करावा लागायचा. त्यामुळे जिल्हाधिकाèयांनी पूर्ण झालेल्या प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीपैकी ७ हजार ६२० हेक्टर क्षेत्राचे निर्बंध हटविले आहे. त्यामुळे ५९ गावातील शेतकèयांना या जमिनी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.तर भविष्यात पुन्हा ५ प्रकल्पातंर्गच्या जमिनी सुध्दा मोकळ्या होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी आज पत्रपरिषदेत दिली.
जनतेच्या हितासाठी शासन एखाद्या प्रकल्पाची निर्मिती करीत असते. कोणताही प्रकल्प म्हटले की त्याला जमिनीची आवश्यकता पडते.शासन त्या प्रकल्पासाठी जमिनीचे भूसंपादन करते. अनेकदा प्रकल्पासाठी आवश्यकतेपेक्षा भविष्याचे नियोजन लक्षात घेऊन अधिक जागेचे संपादन केले जाते. गोंदिया जिल्ह्यात आजघडीला ११ पूर्ण झालेल्या प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन करण्यात आले आहे. यापैकी ६ प्रकल्पाअंतर्गत संपादीत करण्यात आलेल्या ७ हजार ६२० क्षेत्रातील जमिनीवरील निर्बंध जिल्हाधिकाèयांनी हटविले.
यामध्ये अदानी पॉवर महाराष्ट्र लिमिटेड या वीज प्रकल्पांतर्गत येणाèया पाच गावातील ९३४.७३ हेक्टर, बिरसी विमानतळाअंतर्गत सात गावातील ५०३.३३ हेक्टर क्षेत्र, रजेगाव-काटी उपसा qसचन योजना अंतर्गत येणाèया २३ गावातील ३ हजार ४० हजार हेक्टर क्षेत्र, तेढवा-शिवणी उपसा qसचन योजना प्रकल्पांतर्गत येणाèया १५ गावातील ३ हजार २९२ हेक्टर क्षेत्र, भुराटोला लघू पाटबंधारे प्रकल्पांतर्गत येणारे ६ गाव व धापेवाडा उपसा qसचन टप्पा दोन अंतर्गत येणाèया ३ गावातील संपादीत केलेल्या जमिनीवरचे निर्बंध हटविण्यात आले आहेत. ७ हजार हेक्टर क्षेत्र हे कृषी क्षेत्र असल्याने येथील शेतकèयांना या जमिनी संदर्भात कोणतेही निर्णय घेता येत नव्हते. परंतु जिल्हाधिकाèयांनी निर्बंध हटविल्यामुळे या शेतकèयांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.