नाभिक समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

0
8

गोंदिया,दि.8-महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या गोंदिया जिल्हा शाखेच्यावतीने आज गुरुवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून भंडारा जिल्ह्यातील साकोली येथील प्रकरणाचा निषेध नोंदवित मुर्तीची विटंबना करणार्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.मोर्च्यामध्ये मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाला होता.महिला आघाडीच्या अद्यक्षा अनिता चन्ने यांनी सरकार समाजावर अन्याय करीत असल्याची टिका यावेळी केली.युवा समितीचे अद्यक्ष संजय चन्ने यांनीही विचार व्यक्त केले.