त्या वैद्यकीय अधिकार्‍याला अटक करा

0
5

भंडारा दि.११-:बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता मालडोंगरे यांना जातीवाचक शिवीगाळ करणारे त्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ.गुलाब कापगते यांना फरार घोषित करावे तसेच त्यांना अटक करण्यासाठी पोलीस विभागाने शोध मोहीम राबवावी. फिर्यादी आणि साक्षीदाराच्या जिवितास धोका लक्षात घेता त्यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशा सूचना राज्य अनुसूचित जाती, जमाती आयोगाची अध्यक्ष सी.एल. थूल यांनी केले.
डॉ.सविता मालडोंगरे यांच्या प्रकरणाला १ महिना उलटूनही आरोपी पकडला गेला नाही.या पार्श्‍वभूमीवर आज आयोगाचे अध्यक्ष सी.एल.थूलहे भंडारा जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. यावेळी ते बोलत होते. भंडारा येथील विश्रामगृहात त्यांनी जिल्हाधिकारी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याशी चर्चा केली. तसेच बारव्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देवून वैद्यकीय अधिकारी डॉ.सविता मालडोंगरे यांच्याशी सुद्धा चर्चा करून माहिती घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी धीरजकुमार, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवरकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) पी.पी. धरमशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डी.एन. धारगावे उपस्थित होते.