पेंढरी गावाला आदर्श गाव बनविणार- आ.डॉ.देवराव होळी

0
12

धानोरा, दि.१२- : धानोरा तालुक्यातील पेंढरी गावाला दत्तक घेऊन या गावाला आदर्श गाव बनविण्याची ग्वाही आ.डॉ.देवराव होळी यांनी दिली. पेंढरी येथे आज परिसरातील गावांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती, यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.होळी बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य नामदेव शेडमाके, भारतीय स्टेट बँकेचे अधिकारी श्री.महाजन, श्री.जाधव, सरपंच दूरदर्शना आतला, उपसरपंच पवन येरमे, ग्रामपंचायत सदस्य योगेंद्र आतला, वनिता निकोडे, भाग्यश्री चौधरी, अनिल उसेंडी, काशिनाथ आतला, सोनम पवार, प्रणिता दुगा उपस्थित होते. संचालन ग्रामसेवक जयंत मेश्राम, तर प्रास्ताविक पवन येरमे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संतोष मंडल, कालिदास लेनगुरे, दयानंद पवार, किरण शेडमाके, महेंद्र गेडाम, कोमलदेव पवार यांनी सहकार्य केले.