औषध विक्रेत्यांचा देशव्यापी बंद बुधवारी

0
27

गोंदिया दि.१२-: ऑनलाईन फार्मसीच्या विरोधात ऑल इंडिया ऑर्गनाईजेशन ऑफ केमिस्ट अँंड ड्रगिस्ट (एआयओसीडी) संघटनेच्यावतीने बुधवारी (दि.१४) देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ऑनलाईन शॉपिंगची सुविधा उपलब्ध करवून देणार्‍यांकडून डॉक्टरांचे प्रिस्क्रीप्शन बंधनकारक असलेल्या औषधीही ग्राहकांना पुरविल्या जात आहेत. एकीकडे औषध विक्रेत्यांना ज्या औषधींसाठी निर्बंध व अटी लावण्यात आल्या आहेत. त्याच औषधी ऑनलाईन शॉपींगवर मात्र घरबसल्या सहज उपलब्ध होत आहेत. यातून युवा वर्गात व्यसनाधिनता वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच ऑनलाईन शॉपींगचे हे फॅड वाढल्यास आठ लाख केमीस्ट व ४0 लाख कर्मचारी यामुळे प्रभावीत होतील.
यासह अन्य दुष्पपरिणाम भोगावे लागणार आहेत. करिता संघटनेच्यावतीने ऑनलाईन फार्मसीचा विरोध करीत बुधवारी (दि.१४) औषध विक्रेत्यांचे देशव्यापी संप बंद पुकारण्यात आले आहे.