अतिक्रमण हटविण्याची मागणी उपोषणाची तयारी

0
10

गोंदिया दि.१२: सूर्याटोला येथील बांधतलावावरील अतिक्रमण हटविण्यात यावे या मागणीला घेऊन आता परिसरातील नागरिक एकत्र येत असून ते रस्त्यावर उतरले आहेत. तर मागणीसाठी सेवानवृत्त शिक्षक धनलाल सुर्यवंशी २२ तारखेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसणार आहेत.
बांधतलाव ८0 एकरात पसरले असून काही भूमाफियांनी तलावाच्या काही जागेवर अतिक्र मण करून त्या जागेचे ए.ने. करून प्लॉटींग केली. लोकांना विकण्यासाठी तिथे अनधिकृत एक विहिर व घर बनवून त्या जागेवर अतिक्रमण केले आहे. तसेच तलावाचे पाणी वाहून जाण्याच्या कालव्यावरही भिंत बांधून अतिक्रमण केले आहे. चुकीने केलेले एन.ए. रद्य व्हावे व संबंधित अधिकार्‍यांवर कार्यवाही करण्यात यावी यासाठी मागील सेवानवृत्त शिक्षक धनलाल सुर्यवंशी संघर्ष करीत आहेत. दरम्यान रविवारी (दि.११) परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन बैठक घेतली.