गडचिरोलीच्या सर्वांगीण विकासाला राज्य सरकारची प्राथमिकता – अनुपकुमार

0
7

गडचिरोली दि.२८ : गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा ही शासनाची प्राथमिकता आहे. यामुळे येथील कामात सर्वच अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या कर्तृत्वात कुचराई शासन खपवून घेणार नाही. याचीही जाणीव ठेवावी, असे नागपूर विभागाचे आयुक्त अनुपकुमार यांनी सांगितले.

दोन दिवसाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या अनुपकुमार यांनी जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुख अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीस जिल्हाधिकारी रणजीत कुमार, जि.प.कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, जिल्हा नियोजन अधिकारी धनंजय सुटे आदी उपस्थित होते.

टंचाई आराखडा तयार करताना नळदुरुस्ती तसेच हातपंप दुरुस्ती आणि पाणीपुरवठा योजनेच्या दुरुस्तीची कामे प्राधान्याने घ्यावे. टंचाईच्या स्थितीत लोकवर्गणीची अट नसल्याने गतिमान पद्धतीने ही कामे करणे यंत्रणांना शक्य आहे. याद्वारे आपण जनतेची मदतच करणार आहोत त्यामुळे अशा नियोजनावर भर द्यावा, असेही विभागीय आयुक्त म्हणाले.

जिल्हाधिकाऱ्यांनी 376 गावातील टंचाई स्थितीबाबत म्हणाले, प्रत्यक्ष पीक कापणीच्या आधारे पुन्हा एकदा अंतिम पैसेवारी निश्चित करुन नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची संधी आपणास आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना मदत करण्याची सकारात्मक भूमिका आपण ठेवावी.