समाजाने वैयक्तिक परिवर्तनातून सामाजिक क्रांती घडवावी-कडू

0
22

अर्जुनी मोरगाव दि.२९- विचारांनी प्रश्न सुटतात, वाचनाने मनुष्य संत होतो. दलीत समाजाने भगवान बुद्धाचे विज्ञानवादी विचार व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे मंत्र अवलंबिले. आपला समाज प्रगतीचे संपूर्ण शिखर पादाक्रांत करतोय. आजही कुणबी समाज व्रत, वैकल्प, सण, उत्सव यांच्यात गुंतून आहे. तर ब्राम्हणांनी आणि मनुवाद्याने गुरुकडून स्वत:चे अस्तित्व निर्माण करू शकले नाही. एकट्या विदर्भात ६000 कुणबी शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची माहिती प्रा.जेमीनी कडू यांनी व्यक्त दिली.
तालुक्यातील कुणबी समाज संस्थेद्वारे कुणबी सभागृहात आयोजित कोजागिरी कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी दादा फुंडे, पं.स.सभापती अरविंद शिवणकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, जि.प. सदस्या नूतन पाऊलझगडे, बाजार समिती उपसभापती लायकराम भेंडारकर, संध्या केचे, अनिरुद्ध ढोरे, विश्‍वास अवतारे, पांडे उपस्थित होते.
जो समाज शेकडो वर्ष अंधारात कितपत होता त्यांनी बुद्धधम्माची कास धरली . त्याचप्रमाणे ‘अंत दिप भव’ मार्गाचा अवलंब करुन स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण केले. हे केवळ बौद्धीक परिवर्तनाने शक्य झाले. वास्तविक आता कुणबी समाजाने वैयक्तीक परिवर्तन करुन सामाजिक क्रांती घडवावी असही ते म्हणाले. अज्ञान दूर सारण्यासाठी वाचन आवश्यक आहे. जागाच्या पाठीवर जी क्रांती झाली ती वाचनाने, संपत्ती, सौंदर्य व लता याने प्रतिष्ठा मिळत नसून ती फक्त ज्ञानाने मिळते. जोपर्यंत ज्ञानाचे महत्व कळणार नाही. कुणबी विकसीत होणार नाही. सरकार व टिकाकारांना शेतकरी आत्महत्या करते त्यांच्यासाठी राज्य सरकारची तिजोरी रिकामी असते. मात्र कुंभमेळय़ासाठी हेच सरकार ४ हजार कोटीची उधळपट्टी करतो. युवकांनी नौकर्‍यांच्या मागे धावण्यापेक्षा स्वंयप्रकाशित व्हावे, नोकर्‍या तुमच्या मागे धावतील असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप काकडे, संचालन कृष्णकांत खोटेले तर आभार प्रा. सुनिता हुमे यांनी मानले. यशस्वितेसाठी गिरीष बागडे, गणेश फुंडे, धनलाल रहिले, दिलीप फुंडे, संपत कठाणे, उध्दव मेहेंदळे, देवीलाल ब्रामहणकर, शरद बहेकार, गिता ब्राम्हणकर, शिवचरण राघरेते, आनंदराव शिवणकर आदिंनी सहकार्य केले.