भूमिगत विद्युतीकरणासाठी कटिबद्ध-खा.पटोले

0
15

गोरेगाव,दि.29: नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकवा.नगर पंचायत अंतर्गतच्या सर्व विद्युत लाईन अंडरग्राऊंड करण्यास सहकार्य करेल व गोरेगाव नगराच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल असे आश्‍वासन भाजप उमेदवारांच्या प्रचारसभेत खासदार नाना पटोले यानी दिले.
सभेला खासदार नाना पटोले,माजी आमदार खुशाल बोपचे,हेमंत पटले,खोमेश्वर रहांगडाले,जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल,महिला आघाडी प्रदेश चिटणीस सीता रहागंडाले,पंचायत समिती सभापती दिलीप चौधरी,उपसभापती सुरेंद्र चौधरी,दिनदयाल पटले,चित्रलेखा चौधरी,डाॅ.लक्ष्मण भगत.के.टी.कटरे,नितीन कटरे,रेखलाल टेंभरे,माजी सभापती मोरेश्वर कटरे,तेजेद्र हरिणखेडे आदी उपस्थित होते. पटोले म्हणाले, काँग्रेस – राष्ट्रवादीच्या काळात पैसे भरूनही विहिरीवर पंपासाठी दोन लाख शेतकर्‍यांना वीज कनेक्शन दिले नाही. भाजप सेनेचे सरकार सत्तेवर येताच भाजपने मागेल त्या शेतकर्‍याला विहिरीवरील पंपासाठी वीज कनेक्शन दिले जाईल. लाखनी नगरपंचायत झाल्यामुळे केंद्र व राज्य शासनाच्या ४0 ते ४५ योजनांचा फायदा घेता येईल. विकासाचा आराखडा तयार करा व मंत्रालयात पाठवा. राज्यात शासन भाजपचे असल्याने विकासात हातभार लावले जाईल. रस्ते, गटरलाईन, स्ट्रिट लाईन, क्रीडांगण, बगीचे, स्मशानभूमीचे कामे हाती घेता येतील.