जेएसव्ही चिटफ़ंड कंपनीने गाशा गुंडाळल्याचा आरोप:2०० कोटीच्या जवळपास गुंतवणूक

0
12

चार दिवसापासून कंपनीच्या कार्यालयाला टाळे

विशेष प्रतिनिधी
गोंदिया दि.२९-: – अगदी दिवाळीच्या तोंडावर रेलटोली चौपाटी समोरील जे.एस.व्ही डेव्हलपर्स इंडिया लिमिटेड या नावाच्या चिटफंड कंपनीचे कार्यालय मागील चार दिवसापासून बंद आहे.त्यामुळे ज्या ग्राहकांच्या ठेवीची मुदत संपुष्टात आली आहे.ते पैसे परत घेण्यासाठी येत असले तरी कार्यालय बंद असल्याने या चिटफंड कंपनीत गुंतवणूक करणाèयांचे धाबे दणाणले. हजारो गुंतवणूकदाराचे २०० ते ३०० कोटी गोळा करून या कंपनीने आपला गाशा गुंडाळला असावा असा आरोप काही गुंतवणूकदारांनी केला आहे.
मुळची मध्यप्रदेश राज्यातील भोपाळ येथे नोंदणीकृत असलेल्या या कंपनीने गोंदिया शहरात २०१० मध्ये आपले कार्यालय उघडले. ग्राहकांना ५ वर्षांत दाम दुप्पट रक्कम करून देण्याचे प्रलोभन दिले. २० टक्के कमीशन देण्याचे प्रलोभन देवून १५०० ते २००० एंजेट गोंदिया, भंडारा, बालाघाट, गडचिरोली जिल्ह्यात नियुक्त केले आहेत. इतकेच नव्हे तर मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट, तसेच भंडारा तसेच ब्रम्हपुरी व चंद्रपूरचे ही काम याच शाखेतून चालते.यापूर्वी ही या चिटफंड कंपनीची मनसे, सोनिया ब्रिगेडच्या वतीने तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी या चिटफंड कंपनीत तडडोड ही झाली होती. मात्र कंपनीच्या अधिकाèयांनी तक्रार करणाèयांचे तसेच पोलीसांचे तोंड बंद करून आपला व्यवहार सुरू ठेवण्यात यश मिळविले होते.
२०१० मध्ये गुंतवणूक करणाèया ठेवीदाराची मुदत ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर संपत आली आहे.प्रथम वर्षीच या कंपनीने ७५ कोटीच्या ठेवी जमा केल्या होत्या व त्यांचे १५० कोटी रूपये परत करावे लागणार आहेत.ज्या लोकांच्या ठेवीची मुदत संपली आहे ते पैसे घेण्यासाठी येत असले तरी मुख्यालयातून पैसे आलेले नाहीत.ते आले की, तुम्हाला देवू,आता १० हजार रूपये घेवून जा बाकीचे लवकरच देवू या सारखी उतरे देवून त्यांची बोळवण केली जात आहे.
अधिकृत सुत्रानुसार मिळालेल्या माहिती प्रमाणे कंपनीचे भोपाल येथील मुख्य कार्यालयच मागील तीन वर्षांपासून बंद असल्याने या कंपनीच्या एंजेट मार्फत निव्वळ भूलथापा देण्याचे काम सुरू असल्याचे कळत आहे. राष्ट्रीयकृत बँक,पोस्ट ऑफीस व शासनाच्या विविध ठेवी योजेनअंतर्गत रक्कम दामदुप्पट होण्यासाठी ७ वर्ष लागतात. मात्र ही कंपनी ५ वर्षातच रक्कम दुप्पट करण्याची हमी देत आहे.विशेष म्हणजे जमा करण्यात आलेल्या प्रत्येक १०० रूपयापैकी ४० रूपये कमीशन व बोनस म्हणून एंजेटाना दिला जात असल्याने ६० रूपयाचे पांच वर्षात २०० रूपये कसे होणार याचा साधा हिशोब ग्राहक ही लावत नाही व आमिषाला बळी पडतात. ग्राहकांचा विश्वास बसावा म्हणून लहान रक्कम परत केल्या जातात, मात्र मोठ्या गुंतवणूकदाराना वेगवेगळी कारणे सांगून परत पाठविले जात आहे.
५ वर्षा आधी ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे.त्यांची मॅच्युरेटी आल्याने काही महिन्यापूर्वी रविवारीही सुरू राहणारे कार्यालय मागील चार दिवसापासून बंद आहे.एंजेट गुंतवणूकदारांना कर्मचारी ट्रेनिंगवर गेले आहेत, कार्यालयाला सुट्टी आहे. अशी वेगवेगळी कारणे सांगून टाळण्याचा प्रयत्न करित असले तरी गुंतवणूक दाराची सहनशिलता एक दिवस संपुष्टात येऊन या चिटफंड कंपनीच्या कार्यालयावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘संपर्क नॉट रिचेबल
या कार्यालयाच्या बाहेर qभतीवर संपर्क क्रमांक दिला आहे.त्यावर संपर्क केला असता दोन्ही मोबाईल नंबर बंद असल्याचे लक्षात आले. नागपूर येथील कार्यालयाचे दुरध्वनी सुध्दा बंद दाखविते.गोंदिया येथील कार्यालयात बालाघाट येथील शक्ती हे ‘मॅनेजर म्हणून व रामनगर मधील ऐलिना मॅडम सहाङ्मक मॅनेजर म्हणून काम करतात त्ङ्मांच्ङ्माशी संपर्क केला असता त्ङ्मांचा ही भ्रमणध्वनी ‘नॉट रिचेबलङ्कदाखवत आहे.

गोंदियत चिटफंड कंपनीचा पूर
गोंदिया शहरात गल्लो गल्ली अशा चिटफंड कंपनीचा पूर आला असून आता प्रर्यत अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे.विशेष म्हणजे या कंपन्याची माहिती पोलीस विभागाला ही आहे व पोलीस विभागाला नियमीत हप्ता जात असल्याची चर्चा आहे.