सुभाषबागेचे होणार कायाकल्प – नगरसेवक शिव शर्मा

0
4

गोंदिया: दि.२९– गोंदिया येथील लोकांना सकाळी फिरण्याकरिता असलेला एकमेव सुभाष गार्डन बागेचे सुशोभितीकरणाचे प्रश्न ब-याच दिवसांपासून रखडलेले होते. या समस्येला निकाली काढण्याकरिता २८ आॅक्टोंबर ला सकाळी नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांच्या मार्गदर्शनात नगरसेवक शिव शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बगिच्यात फिरण्याकरिता येणा-या नागरिकांसोबत बगीच्याच्या सुशोभितीकरण व सौंदर्यीकरण आणि स्वच्छतेसह इतर बाबींवर चर्चा करण्यात आली. तसेच सुधारणे संदर्भात नागरिकांच्या कल्पना व सूचना नोंद करून एक समिती नगराध्यक्षांच्या अध्यक्षताखाली गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच दर रविवारी नगरसेवक न. प. प्रशासन व उपस्थित नागरिकांच्या सहकार्याने श्रमदान करून स्वच्छतेचे प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे. या सभेत नगरसेवक शिव शर्मा, अभय अग्रवाल, रंजीत असाटी, दिनेश जयपुरीया, सुरेश जैन, पप्पु अग्रवाल, वठेजाजी, निरंजन अग्रवाल, प्रशांत मुुंदडा, अशोक ठाकुर, सुरेश अग्रवाल यांच्यासह बगीच्यात येणारे नागरिक उपस्थित होते.