रक्तदानाचा संकल्प समाजासाठी प्रेरणादायी -मुनगंटीवार

0
9

चंद्रपूर दि.१ जगाने सर्वच क्षेत्रात उत्तुंग प्रगती साधली असली, तरी वैज्ञानिक तसेच विज्ञानालासुध्दा रक्त तयार करता आले नाही. रक्ताची गरज भासते तेव्हा माणूसच माणसाला रक्त देऊ शकतो. रक्ताचे अनन्यसाधारण महत्त्व असून रक्तदानाचा संकल्प समाजासाठी प्रेरणादायीच असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयाच्यावतीने आयोजित ऐच्छिक रक्तदाता संस्थांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. शहरातील अनेक संस्था व व्यक्तिगत रक्तदात्यांनी रक्तदान करुन राज्य सरकारची वर्षपूर्ती साजरी केली. प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर होते. ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन उद््घाटन करण्यात आले. महापौर राखी कंचलार्वार, आ. नाना शामकुळे, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, मनपा आयुक्त सुधीर शंभरकर यावेळी उपस्थित होते.
डेहराडूनच्या धर्तीवर येत्या तीन वर्षांत उत्तम अशी वन अकादमी उभी केली जाईल. सैनिकी शाळा, बांबू प्रशिक्षण केंद्र उत्कृष्ठ दर्जाचे होणार असून जिल्हयातील १५१ रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याचे त्यांनी सांगितले.