नागरिकांनीचे केले मुर्री रस्त्याचे लोकार्पण

0
11

गोंदिया,दि.1-शहराकडून मुर्रीकडे जाणार्या रस्त्याचे बांधकाम निकृष्ट करण्यात आल्याने जागोजागी खड्डे पडले त्यातच तयार करण्यात आलेले विभाजक सुध्दा चुकीच्या पध्दतीने तयार करण्यात आल्याने या मार्गावरुन ये जा करताना नागरिकांना समस्येला सामोरे जावे लागत होते.या परिसरातील नागरिकांनी अनेकदा या भागाचे आमदार,नगरसेवक व खासदारांना निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली.परंतु भूमिपुजन आणि लोकार्पणासाठीच असलेल्या लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष न दिल्याने परिसरातील नागरिकांनी अभिनव पध्दतीने आंदोलन करुन या रस्त्याकडे जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले.त्यासाठी त्यांना आंदोलनही करावे लागले तरीही एकही विकासपुरुष लोकप्रतिनिधी त्याभागाकडे फिरकला नाही.नागरिकांनीही लोकप्रतिनिधीला भीक न घालता आपल्या पध्दतीने आंदोलन सुरु ठेवल्याने अखेर जिल्हाधिकारी डाॅ.विजय सुर्यवंशी यांनाच त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी स्वत जावे लागले.त्यांनी पाहणी केल्यानंतर आलेल्या चुका बांधकाम विभाग,एमएसईबीच्या लक्षात आणून देत ठराविक वेळेत या मार्गावरील रस्ता पुन्हा दुरुस्त करण्याचे निर्देश देत गुणवत्ता बांधकामात हवी असे स्प्ष्ट निदेर्स दिले.पण कंत्राटदार काम करायला काही तयार नव्हता त्यामुळे आंदोलनात्मक भूमिका घेत मार्गावरील वाहतुक अडविली तेव्हा कुठे बांधकाम विभागाला जाग आली आणि कंत्राटदाराने पुन्हा काम सुरु केले ,तिरोडा येथील असाटी या कंत्राटदाराला काम होते त्या कंत्राटदाराचा आजपर्यंतचा हा पहिला काम चांगला झाला असावा असे नागरिकांचे म्हणने आहे.या रस्त्याचे बांधकाम पुर्ण झाल्याने नागरिकांनीच आज 1 नोव्हेबंरला लोकार्पण कार्यक्रम घेऊन रस्त्याचे लोकार्पण केले.विशेष ज्यां लोकप्रतिनिधीनी या रस्त्यासाठी कुठलेच सहकार्य केले नाही त्यानी आज रस्ता लोकार्पण करण्याचा कार्यक्रमाचे नियोजन केले होते.त्यावर परिसरातील सुज्ञ नागरिकांनी पानी फेरत लोकार्पण स्थानीय काशीनाथजी सोनवाने, हरिविलासजी तिवारी, भैरवप्रसादजी मिश्रा, डा.मौजे, डा.धुवारे, योगेश्चंद्र्जी उपाध्याय, महेन्द्रजी सोलंकी, तेजराम मोरघडे, हंसू वासनिक, सुनील रोकडे, विजय अग्रवाल, पप्पू कनोजिया, संजय मुरकुटे व मुर्री रोड संघर्ष समितिचे सर्व सदस्य नागरीकांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी आतषबाजी करुन आनंद साजरा करण्यात आला.उपस्थितांचे अभिनन्दन एवं आभार हर्षल पवार यांनी मानले.