गडचिरोली व चंद्रपुर जिल्ह्यात सरासरी 70 टक्के मतदान

0
13

गडचिरोली,चंद्रपूर,दि.१: आज झालेल्या दक्षिण गडचिरोलीकडील सहा नगर पंचायतींच्या निवडणुकीत दुपारी 4 वाजतापर्यंत 65 टक्के मतदान झाले. मुलचेरा येथे 67 टक्के, चामोर्शी येथे ६9 टक्के, मुलचेरा येथे 67 अहेरीत 80, सिरोंचात ६३.७९, एटापल्लीत 81 तर भामरागडमध्ये ६5 टक्के मतदान झाले. मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, एटापल्ली व भामरागड या संवेदनशील स्थळीही चांगले मतदान होत असल्याचे दिसून येत आहे. आज राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी अहेरी येथे मतदानाचा हक्क बजावला.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर नगरपरिषद व पोभुर्णा आणि सावली नगरपंचायतीसाठी सुध्दा आज मतदान झाले.सरासरी 75 टक्के मतदान झाल्याचे वृत्त आहे.चिमूर येथे आमदार बंटी भांगडीया,काँग्रेस नेते अविनाश वारजुकर आदींनी मतदानात सहभाग घेतला.