भरमार बंदुकीसह एकास अटक

0
9

गडचिरोली,  दि.१०: छत्तीसगड सीमेवरील सावरगाव पोलिस मदत केंद्रातील पोलिसांनी काल एका इसमास शस्त्र बाळगण्याच्या गुन्हयाखाली अटक केली. सुकलू कडयामी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

सुकलूकडे एक भरमार बंदूक आढळून आली. त्याचा नक्षल्यांशी संबंध आहे का, याविषयी तपास सुरु असल्याची माहिती धानोऱ्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.टिके यांनी दिली.