मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या समस्या तातडीने निकाली काढणार-बीडीओ खोटेले

0
39

गोंदिया:- मागासवर्गीय कर्मचारी,शिक्षक व अधिकारी यांच्या प्रलंबित समस्या निकाली काढण्यात यावे, यासाठी १७ ऑगष्ट २०२१ ला कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक यांच्या नेतृत्वात गटविकास अधिकारी पंचायत समिती गोंदिया यांचेकडे झालेल्या  बैठकीत समस्यांचे निवेदन पत्र देण्यात आले. सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन बीडीओ दिलीप खोटेले यांनी दिले.या प्रसंगी जनार्दन राऊत गटशिक्षणाधिकारी , गौरकर प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सातवे वेतन आयोगा अन्वये आपल्या अधिनस्त असलेल्या सर्व कर्मचारी /अधिकारी यांचे आश्वासित प्रगती योजना अंतर्गत 10,20 व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर ची तीन लाभांची सुधारित आश्वासित प्रगती योजना 1/1/ 2016 पासून लागू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी.जिल्हा परिषद शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी प्रस्ताव अविलंब जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावे.जिल्हा परिषद कर्मचारी/ शिक्षक/अधिकारी यांच्या सेवा पुस्तिका सातव्या वेतन आयोगाच्या मंजुरीसाठी जिल्हा परिषद गोंदिया येथे त्वरित पाठविण्यात यावे.सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेन्शन विक्री अंशराशीकरण मंजूर झाल्यानंतरही सदर अंशराशीकरण राशी वेळेवर मिळत नाही ती त्वरित देण्यात यावी.जिल्हा परिषद कर्मचारी/ शिक्षक /अधिकारी यांचे सातव्या वेतन आयोगाचा पहिला व दुसरा हफ्ता तातडीने जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावे.जिल्हा परिषद कर्मचारी/ शिक्षकांचे उच्च परीक्षेला बसण्याचे व परीक्षा पास झाल्याचे काऱयोत्तर परवानगी अर्ज जिल्हा परिषद गोंदिया येथे अविलंब पाठविण्यात यावे. जिल्हा परिषद कर्मचारी/ शिक्षक/ अधिकारी यांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके अविलंब जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावे.सेवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले कर्मचारी/ शिक्षक/ अधिकारी यांची सेवानिवृत्ती फाईल तातडीने जिल्हा परिषद गोंदिया येथे पाठविण्यात यावी व ज्यांची सेवा पुस्तिका काही कारणास्तव जिल्हा परिषद गोंदिया येथे अडकून पडली असेल तर संबंधित विभागास पत्र पाठवून त्वरित मागणी करण्यात यावी. तसेच सदर कर्मचाऱ्यांची सेवा निवृत्त फाईल तयार करून जिल्हा परिषद गोंदिया येथे तातडीने पाठविण्यात यावी.
सेवानिवृत्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे प्रलंबित एक रक्कमी पेन्शन प्रस्ताव तातडीने मंजूर करण्यासाठी संबंधित विभागात पाठविण्यात यावे. अंगणवाडी सेविका यांचे प्रलंबित प्रवास भत्ता देयके मंजूर करण्यात यावे.शासन निर्णया अन्वये सेवानिवृत्त कर्मचारी/ शिक्षक अधिकारी यांच्या समस्या निकाली काढण्याकरिता दर महिन्याच्या पहिल्या मंगळवार ला पेन्शन अदालत सभा आयोजित करण्यात यावी.सेवानिवृत्त कर्मचारी /शिक्षक/ अधिकारी यांना दर महिन्याच्या एक तारखेला सेवानिवृत्त वेतन देण्यात यावे.सेवानिवृत्त कर्मचारी/ शिक्षक/ अधिकारी यांच्या सातवे वेतन आयोगाच्या पहिला व दुसरा हप्ता रोखीने प्रदान करण्याची कार्यवाही करण्यात यावी. मागासवर्गीय कर्मचारी/ शिक्षक /अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती प्रकरणे सहा महिन्याच्या पूर्वी जिल्हा परिषद गोंदिया येथे मंजुरीकरिता पाठवणे संदर्भात संबंधित अधिकारी वर्ग यांना सूचित करून कार्यवाही करण्यात यावी.मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी /शिक्षक /अधिकारी यांना उपदान,अंशराशीकरण,रजा रोखिकरण, भविष्य निर्वाह निधी व गट विमा राशी तातडीने प्रदान करण्या संदर्भात कार्यवाही करण्यात यावी.आपले अधिनस्त असलेले सर्व विभागातील कर्मचारी/ शिक्षक /अधिकारी यांचे मासिक वेतन व मानधन कारक कर्मचाऱ्यांचे मासिक मानधन वेळेवर करण्या संदर्भात कारवाई करण्यात यावी. कास्ट्राईब महासंघ सोबत झालेल्या चर्चेची काऱयोत्तर प्रत संघटनेला अविलंब देण्यात यावी.या सह अनेक समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सर्व समस्या तातडीने निकाली काढण्याचे आश्वासन बीडीओ यांनी दिले.यावेळी शिष्टमंडळात कास्ट्राईब कर्मचारी महासंघ जिल्हा गोंदिया चे जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश वासनिक, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय उके, महासंघाचे जिल्हा सरचिटणीस प्रवीण गजभिये, जिल्हा उपाध्यक्ष धर्मशील रामटेके, तालुकाध्यक्ष जितेंद्र बोरकर, निशिकांत मेश्राम, डी.व्ही. सोनकनवरे, व्ही.बी. वैद्य, महेश वैद्य, रोशन गजभिये, सौ.के.के.कठाणे या सह सौ.एम .एस.परीहार, सौ. एन.डी. थाटे, पारधी, नायडू लिपिक यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.