राहुल द्रविडची कर्‍हांडलामध्ये जंगल सफारी

0
6

नागपूर दि. १३: माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने गुरुवारी आपल्या परिवारासह उमरेड-कर्‍हांडला अभयारण्यात जंगल सफारी केली. दरम्यान, त्यांना पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत असलेल्या ‘जय’ या वाघाचे सतिघाट येथे दर्शन झाल्याची माहिती उमरेड-कर्‍हांडला अभयारण्याचे वन परिक्षेत्र अधिकारी जी. एफ. लुचे यांनी दिली.सकाळी ७ वाजताच्या सुमारास राहुल आपली पत्नी अंजली, मुलगा अन्वय व सासू-सासर्‍यांसह उमरेड-कर्‍हांडला येथे दाखल झाला. यानंतर त्यांनी खुल्या जिप्सीतून जंगल सफारीसाठी अभयारण्यात प्रवेश केला.
साधारण एक तासाच्या जंगल सफारीत त्यांनी रानबोडी व सतिघाटसह विविध स्पॉटला भेटी दिल्या. त्याचवेळी सतिघाट येथे त्यांना ‘जय’ दिसला. ‘जय’ ला पाहून राहुल द्रविडसह त्याच्या संपूर्ण कुटुंबीयांनी आनंद व्यक्त केला. यानंतर ठाणे येथील रिसोर्टवर राहुलला सेंच्युरी एशिया या संस्थेचे ‘लॅण्ड स्केप’ नावाचे पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी वाईल्ड लाईफ कन्झर्व्हेशन अँण्ड डेव्हलपमेंट सेंटर, उमरेडचे समन्वयक सुब्रोतो बॅनर्जी, मानद वन्यजीव रक्षक रोहित कारू , वन परिक्षेत्र अधिकारी जी. एफ. लुचे व महंग मिश्रा उपस्थित होते.