मनपातर्फे तुकूम येथे ताप सर्वेक्षणअंतर्गत २१७ संशयित रुग्णांची रक्त तपासणी

0
9

स्थानिक नगरसेवक सुभाष कासनगोटुवार यांच्या पुढाकारातून शिबीर  

– महापौर, स्थायी समिती समिती सभापती यांनी दिली भेट  

चंद्रपूर, ता. १२ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक ७ अंतर्गत हनुमान मंदिर, ताडोबा रोड येथे ताप सर्वेक्षण व संशयित रुग्णांचे रक्त तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी सुमारे २१७ संशयित रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. शिबिराला महापौर राखी संजय कंचर्लावार, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांनी भेट दिली. सदर शिबिराचे आयोजन नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.
सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. प्रभागातील नागरिकांच्या हस्ते महापौर व स्थायी समिती सभापती यांचा पुष्पगुच्छ व श्रीमदभगवद्गीता देऊन सन्मान करण्यात आला. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने रोगांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी वैयक्तिक खबरदारी घ्यावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्यात यावा आणि अधिकाधिक नागरिकांनी तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले. त्यांनी उपस्थित नागरिकांना डेंग्यू व इतर साथरोग नियंत्रणसंबंधी मनपा प्रशासन राबवित असलेल्या उपाययोजनांबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी नगरसेवक माया उईके, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, मंजुश्री कासनगोटटूवार, जे. के.  सिंग, सुधाकर बोंडे, हरिश्चंद्र भाकरे, प्रभाकर आक्केवार,नारायण पतरंगे, गजानन भोयर, अरविंद मडावी, सीमा मडावी, शशी शंभरकर, सुरेखा बोंडे, सुधाकर टिकले, विजय मेश्राम, आशिष बोंडे, आकाश मस्के, आशिष ताजने, बंडू गोरकर व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार यांनी केले.