सेजगाव खुर्द येथे 200 जणांचे लसीकरण

0
24

गोंदिया,दि.14ः तालुक्यातील ग्राम पंचायत सेजगाव खुर्द येथील जि. प. प्राथमिक शाळेमध्ये १३ सप्टेंबरला कोरोना लसीकरणाचे आयोजन MO बिसेन यांच्या सहयोगाने करण्यात आले. लसीकरण कार्यक्रम उप-सरपंच प्रमोद पुरणलाल पटले यांच्या अध्यक्षतेमध्ये राबविण्यात येत असून आरोग्य विभागातील आरोग्य सेविका ठाकरे, आशा सेविका लिल्हारेबाई, पालियाबाई , चिखलोंढेबाई, अंगणवाडी सेविका येळेबाई, लिल्हारेबाई,भूमेश्वर बिसेन, कार्तिक पटले, सहकार्य करीत आहेत. गावात शिबीर घेतल्याने गावातील लोक खूप आनंदाने व उत्साहाने शिबीर माध्यमातुन लस घेत आहेत.२०० लसीकरण करण्यात आले.उपसरपंच पटले यांनी गावात १००% लसीकरण व्हायला हवे याकरिता हे शिबीर अजून काही दिवस ठेवावे अशी मागणी केली.लसची उपलब्धता असल्याने अजून २ – ३ दिवस लसीकरण शिबिर सुरु  राहणार असल्याने नागरिकाना लसीकरण करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी ग्राम पंचायत सचिव श्रीमती साखरे, ग्राम पं. सदस्य संतोष पटले, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्या आणि शाळेचे मुख्याध्यापक कावळे,बनसोड, ग्राम पंचायत कर्मचारी मुकेश बिसेन, सुभाष खरोले व गावातील प्रतिष्ठित नागरिक लसीकरणासाठी जनजागृती करीत आहेत.