इटखेडा जिल्हा परिषद शेत्रात विकास कामांचे भूमिपूजन

0
24

अर्जुनी मोर,दि.19- मोरगाव अर्जूनी तालुक्यातील इटखेटा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावात काल शनिवारी (दि.18) विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे हस्ते करण्यात आले.

यामध्ये इटखेड़ा जि.प क्षेत्रातील देऊळगाव बोदरा,तिड़का,ताड़गाव,बोळ्दे, धाबेटेकड,आदर्श बुधेवाडा, वडेगांव, इटखेड़ा, ईसापुर, खामखुर्रा,येगाव या गावातील विकास कामांचा समावेश आहे. तसेच सर्व ग्रामपंचायतीला भेट करून गावातील समस्या श्री चंद्रिकापुरे यांनी जाणून घेतल्या.
सदर कार्यक्रमास राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, राकेश लंजे, उद्धव मेहेंदळे, निप्पल बर्रेय्या, आर के जांभुळकर, प्रमोद डोंगरे, दीपक सोनवणे सरपंच धाबेटेकडी, शंकर उइके सरपंच बोदरा/देऊळगांव, बबिता उइके सरपंच तिड़का, अश्विन कोडापे सरपंच इटखेड़ा, संगीताताई लाडे सरपंच, बुधेवाड़ा, मिनाबाई लंजे सरपंच बोळदे/करड, रश्मि खूणे सरपंच वडेगांव/रेल्वे, कल्पना करंजे सरपंच इसापुर, अजय अबादे सरपंच खमखुर्रा, अनिल पालीवार येगांव याचे सह गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.