अभयारण्य प्रतीक्षागृहाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे

0
9

पवनी दि. २0::  पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर अंतर्गत उमरेड-कर्‍हांडला अभयारण्य वनपरिक्षेत्र (वन्यजीव) पवनी येथे खापरी रस्त्यावरील गेटजवळ पर्यटकांसाठी प्रतिक्षागृहाचे बांधकाम पूर्ण व्हायच्या आंतच इमारतीचे काम निकृष्ठ दर्जाचे होत असल्याचे पुरावे दिसू लागले आहेत.
जय नावाच्या वाघामुळे उमरेड-कर्‍हांडला अभयारण्य पर्यटकांचे आर्कषण ठरत आहे. विदर्भातील ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्पानंतर भेट देणार्‍या पर्यटकांसाठी संख्या पवनी वनपरिक्षेत्रात वाढत आहे. र्मयादेपेक्षा जास्त पर्यटकांना अभयारण्यात पाठविले जात नाही त्यामुळे पर्यटकांना प्रतिक्षा करण्यासाठी गेट लगत प्रतिक्षा गृह निर्मितीचे काम सुरु करण्यात आलेले आहे. लाखो रुपये खर्च करुन निर्माण होणारे प्रतिक्षागृह उत्तम दर्जाचे व्हावे ही अपेक्षा पर्यटकांची आहे परंतु वरिष्ठ अधिकारी बांधकामाकडे दुर्लक्ष करीत असल्याने सुरु असलेले बांधकाम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. प्रकाशाकरिता खिडक्या ठेवल्या त्यावर सज्जा काढला परंतु सज्जाला पकड असण्यासाठी लॅटर्न देण्यात आलेले नाही. इमारतीच्या मागचे भागात जमिनीलगत लक्ष दिल्यास इमारतीच्या पायाचे (फाउंडेशन) निकृष्ठ दर्जाचे करण्यात आल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.