राज्य नाट्य स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे उद््घाटन

0
13

चंद्रपूरदि. २0: राज्य नाट्य स्पर्धेच्या चंद्रपुरातील केंद्रावरील प्राथमिक फेरीचे उद््घाटन १८ नोव्हेंबरला सायंकाळी पार पडले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद््घाटन पार पडले. जिल्हा पोलीस अधीक्षक संदिप दिवाण, ज्येष्ठ कलावंत डॉ. शरदचंद्र सालफळे या स्पर्धेच्या परिक्षणाची जबाबदारी सांभाळणारे डॉ. शशिकांत चौधरी, राजाराजेश्‍वर व नाट्य व सिने अभिनेत्री संजिवनी जाधव यांच्या उपस्थितीत उद््घाटन सोहळा पार पडला.
यावेळी बोलताना डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले, चंद्रपुरात नाट्य रसिकांचा कल चांगला असून त्यांचे प्रोत्साहन हेच खरे कलावंताचे बळ असते. राज्य नाट्य स्पर्धेच्या पाठोपाठ कामगार कल्याण केंद्राने मराठी रंगभूमीसाठी केलेले परिश्रमही महत्त्वाचे आहेत. यावेळी अन्य पाहुण्यांनीही शुभेच्छा दिल्या.संचालन व आभार सुशील सहारे यांनी मानले