शिस्त लावण्याचा प्रयत्न केला म्हणून खोट्या तक्रारी-डॉ. मकरंद व्यवहारे

0
7

नागपूर : न्याय वैद्यकशास्त्र (फॉरेन्सिक) विभाग अत्यंत संवेदनशील विभाग आहे. हा विभाग थेट लोकांशी जुळलेला आहे. यामुळे या विभागात अनुशासन व शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. परंतु विभागातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांना हे नको आहे. त्यांच्या कामचुकारपणावर त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावल्या. म्हणूनच त्यांनी खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत, अशी बाजू न्याय वैद्यकशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. मकरंद व्यवहारे यांनी गुरुवारी पत्रकारांसमोर मांडली.
विभागप्रमुख छळ करीत असल्याची चिठ्ठी सोडत एका निवासी डॉक्टरने मंगळवारी वसतिगृहात ७ क्रमांकाच्या खोलीत झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. ही घटना ताजी असतानाच त्यांच्याच विभागातील एका विद्यार्थिनीने विभागप्रमुख मानसिक आणि शारीरिक छळ करीत असल्याची लेखी तक्रार बुधवारी अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे यांच्याकडे केली. या आरोपांना घेऊन डॉ. व्यवहारे बोलत होते.