दवडीपार येथे धान खरेदी केंद्राचा शुभारंभ

0
19

गोरेगाव,दि.22 : तालुक्यातील दवडीपार येथे पुर्ती समुहाच्यावतीने पहिल्यांदाच शासकीय दरात धान खरेदी केंद्र उघडण्यात आले आहे.या धान खरेदी केंद्राचे शुभारंभ तंटामुक्त समितीचे अध्यक्ष हि.द.कटरे यांच्या हस्ते माजी पंचायत समिती सदस्य डाॅ.साहेबलाल कटरे, ग्रामपंचायत उपसरपंच पुनेश्वर राऊत, गोरेगाव येथील कारागीर संस्थेचे अध्यक्ष देवचंद बिसेन,राध्येशाम सोनवाने,गिर्हेपुंजे मानिकचंद कटरे आदी उपस्थित होते.

मुंडीकोटा -येथील आदिवासी सहकारी संस्थेचे आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. अध्यक्ष गोपीचंद भेलावे यांच्या हस्ते पूजन करून राजकुमार असाटी यांनी लाल फित कापून खरेदी केंद्राचा शुभारंभ केला. १0 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले होते. परंतु धान खरेदी केंद्र सुरूच झाले नव्हते.त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता. आता शेतकर्‍यांची समस्या सुटणार आहे. यावेळी विविध सहकारी संस्थेचे सदस्य रामू जायस्वाल, मधुकर कनोजे, सुधीर दुपारे, महादेव साठवणे, ध्रुवराज कटरे, विवेक भांडारकर, राधेश्याम पटले, प्रतिमा तैमस्वार, तानेश्‍वर पारधी, डॉ. भांडारकर, सचिव विनोद तिजारे, व्ही.जी.गजभिये उपस्थित होते. यावेळी दोन शेतकर्‍यांचे धान खरेदी करण्यात आले.