महाराष्ट्र एक्सप्रेस महाराष्ट्रातच राहु द्या- श्रमिक पत्रकार संघ व ओबीसी कृती समितीचे निवेदन

0
21

 

गोंदिया,दि.25- महाराष्ट्राची अस्मिता असणाèङ्मा महाराष्ट्र एक्सप्रेसला महाराष्ट्रातच राहु द्या,तिला दुर्गपर्यंत विस्तारीत करून महाराष्ट्रीय माणसाला दुखवू नका अन्यथा येथील जनतेला तीव्र आंदोलन उभारावे लागेल असे निवेदन श्रमिक पत्रकार संघ व ओबीसी कृती समितीच्ङया वतीने गोंदिया रेल्वे स्टेशनचे वरिष्ठ प्रबंधक आर. एन.कार यांच्या मार्फेत भारताचे रेल्वमंत्री सुरेश प्रभू यांना पाठविण्यात आले.
वर्तमान पत्रातील बातम्या तसेच सोशल मिडीया व विकिपिडीया वर महाराष्ट्र ए्क्सप्रेसचा घातलेला नविन विस्तारीत मार्गावरून १ डिसेंबर २०१५ पासून महाराष्ट्र  एक्सप्रेस गोंदियाऐवजी दुर्गवरून सोडण्ङ्मात येणार असल्याची चर्चा आहे. ही बाब गोंदिया व महाराष्ट्रातील जनतेचा अपमान असून स्थानिक जनतेमार्फे विरोध केला जात आहे.तरी हा निर्णय रद्द करावा तसेच मागील अनेक वर्षापासून या जिल्हयातील जनतेमार्फेत अनेक राज्ङ्मातून प्रवास करणारी सारनाथ एक्सप्रेस नागपूरपर्यंत विस्तारीत करण्ङ्माची मागणी केली जात आहे. तरी या संदर्भात रेल्वे प्रशासनाने दखल घ्यावी अशी मागणी निवेदनातून करण्ङ्मात आली आहे.
निवेदन देतेवेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्ङ्मक्ष हाजी अल्ताफ शेख, प्रा.एच.एच.पारधी, खेमेेद्र कटरे, मंहेंद्र बिसेन, रवि सपाटे, चंद्रकुमार बहेकार, हरिष मोटघरे, ॠषी कावडे,म‘हेंद्र माने, संजय राऊत, ओबीसी कृती समितीचे बबलू कटरे, बी. पी. ठाकरे, डॉ.सजीव रहांगडाले, अमर वर्हाडे, आशिष नागपूरे, मनोज मेंढे, कैलाश भेलावे, एन. एल.राऊत, पी.डी.चव्हाण, अभिषेक चुटे, रविद्र चुटे, इंजि. राजीव ठकरेले,जितेश राणे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.