बिडीओ वालकरची मनमानी,जमाखर्च सादर करण्यास नकार

0
7

गोंदिया,दि.27-येथील पंचायत समितीचे बिडीओ वालकर जेव्हापासून रुजू झाले तेव्हापासून ते पदाधिकारी असो की कर्मचारी यांच्याशी कसे वागतात याबद्दल चर्चेत राहिले आहेत.त्यातच याच महिन्यात झालेल्या दिवाळी सणाच्यावेळी सुध्दा बिडीओ वालकर यांनी पंचायत समितीमधील कर्मचारी व अधिकारी यांच्याकडून पत्रकारांना जाहिरात द्यायचे आहे,त्यासाठी निधी गोळा करायचे हे सांगून पैसे गोळा केले.परंतु जेव्हा पत्रकार जाहिरातीसाठी गेले तेव्हा मात्र पैसे नसल्याचे सांगून गोळा झालेला निधी घेऊन आपली दिवाळी साजरी करायला निघून गेल्याची चर्चा प्रत्येक पंचायत समितीमधील कर्मचारी व अधिकारी यांच्या तोंडात होती.तर काहींनी तो पैसा एका आमदाराच्या घरी गेल्याची चर्चा असल्याचे सांगितले.दिवाळीची चर्चा संपत नाही तोच आज शुक्रवारला पंचायत समितीच्या मासिक सभेत पंचायत समिती सदस्यांनी मागितलेल्या जमा खर्चाची माहिती देण्यास बिडीओ वालकर यांनी केलेली टाळाटाळ पंचायत समितीमधील गैरव्यहाराची कल्पना जणू करुन देते की काय अशा प्रश्न सदस्यांना पडल्याने या सभेवरच बहिष्कार घातल्याचे प्रकरण समोर आले आहे.पंचायत समितीची मासिक सभा सुरु होताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पंचायत समिती सदस्य अखिलेश सेठ यांनी जमा खर्च व इतर माहिती मागितली.परंतु ती माहिती न दिल्याने सभापती स्नेहा गौतम,उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती,पंचायत समिती सदस्य भाजपचे गुड्डू लिल्हारे,प्रकाश पटले यांच्यासह आदी सदस्यांनी सामुहिक बहिष्कार घातला.सभापती व उपसभापती यांनीही बहिष्कार घातल्याने बिडीओ वालकर यांच्यावर किती अविश्वास आहे,हे स्पष्ट होत असून त्यांच्या कार्याकाळातील प्रत्येक कामाची चौकशी व्हावी असाही मुद्दा समोर येऊ लागला आहे.