सडक अर्जुनी नगरपंचायत अध्यक्षपदी राँकाच्या लांजेवार

0
4

सडक अर्जुनी,दि.२७ : नगरपंचायतमध्ये झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या रीता लांजेवार तर उपाध्यक्षपदी बाहुबली पॅनलचे महेंद्र मसराम यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या रिता लांजेवार यांना १२ तर भाजपाच्या गीता शहारे यांनी पाच तर बाहुबलीच्या मसराम यांना १२ तर दिनेश अग्रवाल यांना पाच मते मिळाली. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या रीता लांजेवार, काँग्रेसचे अभयर राऊत, भाजपाचे गीता शहारे यांनी तर उपाध्यक्षपदाकरिता बाहुबलीचे महेंद्र मसराम, भाजपाचे दिनेश अग्रवाल यांनी नामांकन भरले होते.विशेष म्हणजे सडक अर्जुनी नगरपंचायतीचे स्थळ हे पालकमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांचे गृहनगर आहे.याठिकाणी भाजपला निवडणुकीत स्पष्ट बहुमत सुध्दा मिळवता आले नाही.त्यानंतरही सत्ता मिळविण्यासाठी अपक्ष बाहुबली पॅनलला आपल्याकडे ओढण्यातही भाजपच्या मंत्र्यांना अपयश आल्याची चर्चा आहे.राष्ट्रवादीची सत्ता स्थापन करण्यासाठी मनोहर चंद्रिकापुरे,जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर,अविनाश काशीवार,छाया चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी परिश्रम घेतले.