आरक्षणाच्या मुद्द्यावर धनगर समाज आक्रमक

0
14

नागपूर दि-८:धनगर समाजाला अनुसूचित जमातींच्या सवलतींची तात्काळ अंमलबजावणी करा’ अशी मागणी घेऊन राज्यभरातील हजारोंच्या संख्येने धनगर हिवाळी अधिवेशानादरम्यान विधानभवनावर धडकले. हा मोर्चा यशवंत स्टेडियम पासून काढण्यात आला. सत्तेवर येण्यापूर्वी ‘आम्ही सत्तेत आल्यावर धनगर समाजास अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. आज भाजप सत्तेत येऊन १४ महिने झाले मात्र अद्याप हे आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे आक्रमक होत धनगर समाज संघर्ष समितीने आज विधानभवनावर हा मोर्चा काढला होता.

सकाळी ११ वाजता काढण्यात आलेले हे आंदोलन अजूनही सुरूच आहे. जोपर्यंत मुख्यमंत्री चर्चा करण्यास येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. डॉ. विकास महात्मे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.