हत्तीरोग दुरीकरण सामुदायिक औषधोपचार मोहीम-२०१५ १४ ते २० डिसेंबर पर्यंत

0
9

गोंदिया,दि.९ : हत्तीरोग आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहीम-२०१५ राबविण्यात येत आहे. या मोहिमेच्या उदघाटनप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, मुख्य कार्यपालन अधिकारी दिलीप गावडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हरिश कळमकर व आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हत्तीरोग दुरीकरणासाठी सामुदायिक औषधोपचार मोहिमेअंतर्गत दिनांक १४ ते २० डिसेंबर कालावधीत सर्व नागरिकांना डी.ई.सी. व एलबेंड्याझोल गोळ्यांची एक मात्रा देण्यात येणार आहे. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी या गोळ्यांच्या एका मात्रेचे सेवन केले. हत्तीरोग आजाराला आळा घालण्यासाठी सर्व नागरिकांनी गोळ्यांचे सेवन करावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी यांनी केले आहे.