नगराध्यक्ष जायस्वालांनी केले विकास कामांचे भूमिपूजन

0
6

गोंदिया दि.10-स्थानीय प्रभाग क्रमांक ३ मधे नगराध्यक्ष कशिश जायसवाल यांच्या हस्ते  9.50 लाखांचे विकासकामांचा भूमिपूजन करण्यात आले.यावेळी मनोनीत नगरसेवक शिव शर्मा , माजी नगराद्यक्ष दिपक नशिने, माजी नगरसेवक नरु हलानी , माजी सभापति खालिद भाई , नगर परिषद अभियंता भावे , कनिष्ठ अभियंता ढवले , नीरज ठाकुर , ललित जायसवाल आदि उपस्थित होते.  मागील १ वर्षा पासून विकासाच मुद्दा घेऊन  नगर परिषद मधे भाजप पहिल्यांदा सत्तेत आली. सत्तेत आल्या  पासून  नगराध्यक्ष कशिश जायसवालांनी शहराच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करुन शहराला स्वच्छ  व सुन्दर  करण्यासाठी  प्रयत्न सुरु केले आहेत.