आरती बारसे हत्येप्रकरणी एसपी व गृहसचिवांना नोटीस

0
7

गोदिया दि.११: सालेकसा तालुक्यातील सोनारटोला येथील आरती रवींद्र बारसे (१८) या तरुणीच्या हत्येप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती बी.पी. धर्माधिकारी आणि व्ही.एम. देशपांडे यांनी राज्य शासनाचे गृहसचिव आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांना, तसेच आमगांवच्या उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सालेकसाच्या ठाणेदारांना नोटीस पाठविली आहे.

सोनारटोला येथील आरतीचा मृतदेह १८ आॅगस्टला घरासमोरील विहिरीत सापडला होता. तो मृतदेह जळालेला होता. तिच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्याकडून तिला जीवंत जाळून मृतदेह विहिरीत फेकल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता.

याप्रकरणी पोलिसांच्या तपासकार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. आरोपी योगराज चकोले याला पोलीस वाचवित असल्याचा आरोप आरोप कुटुंबियांनी केला होता. त्यासाठी धरणे आंदोलनही झाले होते. आरतीच्या कुटुंबियांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने संबंधितांना नोटीस पाठवून चार आठवड्यात यावर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.