खा.शरद पवारांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त फळवितरण

0
7

गोंदिया,दि.12-राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या 75 व्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आज राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तिरोडा येथील उपजिल्हा रु्ग्णालयात रुग्णांना फळवितरण करण्यात आले.त्यासोबतच तिरोडा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुध्दा फळवितरण करण्यात आले.यावेळी माजी आमदार दिलीप बनसोड,नगराध्यक्ष अजय गौर,उपाध्यक्ष ममता बैस,पंचम बिसेन,सभापती उषा किंदरले,उपसभापती डाॅ.किशोर पारधी,जि.प.सदस्य राजलक्ष्मी तुरकर,मनोज डोंगरे,विणा बिसेन,प्रिती रामटेके,सुनिता मडावी,कैलास पटले,मनोहर राऊत,नत्थुजी पटले,निता रहागंडाले,राजश्री उपवंशी,राखी गुनेरिया,अशोक असाटी,रामभाऊ असाटी,छाया कटरे,ममता हट्टेवार,नेरश कुंभारे,संजय किंदरले,माजी सभापती वाय.टी.कटरे,संजय किंदरले,देवेंद्र मडपे,शामराव खोब्रागडे,तिरोडा रुग्मालयाचे वैद्यकिय अधिक्षक डाॅ.हिम्मत मेश्रामसह रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.