रॅली,सांस्कृतिक कार्यक्रम व जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा

0
10

गोंदिया,दि.१४ : जागतिक अपंग दिनानिमीत्त जिल्ह्यातील अपंगाच्या शासनमान्य शाळांच्या वतीने जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धेचे पोलीस मुख्यालय येथे नुकतेच आयोजन करण्यात आले. क्रिडा स्पर्धेचे उदघाटन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले असून यावेळी जि.प.समाज कल्याण विभागाचे सभापती देवराज वडगाये, जिल्हा क्रिडा अधिकारी अशोक गिरी, प्रभारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी समीक्षा दुधलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
अपंग दिनानिमीत्त विविध कार्यक्रमाअंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रम व जनजागृतीपर रॅलीचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उदघाटन जि.प.च्या उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी केले तर रॅलीला देवराजजी वडगाये यांनी हिरवी झेंडी दाखविली. रॅलीचा समारोप जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव शेख मॅडम यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील अपंग विद्यार्थ्यांना फळ व बिस्कीटांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला जि.प.चे अपंग विभागाचे सहायक सल्लागार मिलींद रामटेके, पोलीस निरिक्षक शिंदे, आर.पी.आय.ब्रम्हेकर, पांडे, उईके, बन्सोड, तोमर, मार्टीन, ठाकुर, पोलीस विभागाचे कर्मचारी, जि.प.चे कर्मचारी वाघ, श्रीमती मोहोड, कोळवते, कढव, सोनटक्के, बोढे, बिसेन, अपंग शाळेचे विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.