डाॅ.गहलोतांनी दिली भोयरला जाळण्याची धमकी,आज कर्मचारी करणार निर्दशने

0
18

गोंदिया-दि.17-जिल्हा परिषदेत सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणून रूजू झालेले डाॅ.गहलोत यांच्या सुरवातीच्या काळापासूनच ते वाद्रग्रस्त राहिले आहेत.भ्रष्टाचार करणायाना ,शासकीय योजना रोखून धरुन नागरिकांना वेठीस धरणार्यांना जवळ करुन इतर कर्मचारी व अधिकारी विरुध्द वातावरण तयार करुन आपली राजकीय पोळी शेकू पाहणार्या गहलोतांनी आरोग्य विभागातील कनिष्ठ सहाय्यक आर.एम.भोयर यांना माहिती न दाखविल्या जाळून टाकण्याची भाषा वापरल्याची घटना 16 डिसेंबरला घडली.यासंदर्भात भोयर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी,व जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाकडे रितसर तक्रार नोंदविली आहे.मुल्ला आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी श्रीमती लांडगे या गेल्या अनेक वषार्पासून तिथेच असून त्यांच्या पासून अनेकांना त्रास झालेला आहे.रात्रीला रुग्णालयात न राहता देवरीला राहतात यामुळे त्यांची बदली होऊ शकते अशी विचारणा काही सामाजिक कार्यकत्यार्नी केली.त्यावर डाॅ.गहलोत यांनी यांंसदर्भात भोयर यांना माहिती विचारली तेव्हा भोयरने बदलीचे अधिकार उपसंचालकाकडे आहेत असे सांगितले.तसेच आपसी बदलीचे काय अशी माहीती विचारत माहिती न दिल्यास जाळून टाकीन अशी धमकीच गहलोत यांनी दिल्याने सदर कर्मचारी तणावग्रस्त झालेला आहे.बहुतांश कर्मचारी यांचामूळे त्रासले आहेत.विशेष म्हणजे पांढरी आरोग्य केंद्रात लाखाचो झालेला घोटाळ्याप्रकरणी तक्रार दाखल न करण्यामागे गहलोत यांची काय भूमिका होती कुणास ठाऊक तसेच जननी सुरक्षा योजनेचे पैसे वितरीत न करणारा लांजेवार नामक कर्मचारी हा गहलोत यांच्यासाठी आर्दश कर्मचारी असल्याचे बोलले जात असून तो रात्रदिवस त्यांच्यासोबत फिरतो बसतो परंतु त्याला त्या योजनेचे धनादेश लवकर काढ असे सांगायची सुध्दा प्रयत्न केलेले नाही.

गहलोत यांना जिल्हा आरोग्य अधिकारी यांचा पदभार स्विकारयाचा असल्याची चर्चा असून कुणाचाही माध्यमातून जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याविरोधात तक्रार करण्यास पुढाकार घेतात.आपला वाढदिवस सुद्दा कार्यालयीन वेळेत साजरा करुन प्रत्येक कर्मचारी व अधिकारीसह काही त्यांची बाजू घेत डिएचओची तक्रार करुन बातमी देणायाना जवळबसवून आपला हारतुर्यानी सत्कार करण्यातच धन्य मानणारे सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या विरोधात आता वातावरण तापले आहे.भोयर यांना जाळून टाकण्याची दिलेल्या धमकीच्या विरोधात आज गुरुवारला दुपारी 12 वाजता जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर निषेध सभा घेऊन डाॅ.गहलोत यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी तसेच माफी मागावी अशी मागणी महासंघाचे अध्यक्ष पी.जी.शहारे,अजय खरवडे,शैलेष बैस,कार्तिक चव्हाण,सुदीप देव,अर्चना आयचित,किशोर मुळे,विनोद चौधरी,एस.डी.तुरकर,अनुप शुक्ला आदीनी निवेदनाद्वारे केली आहे.