पानटपरीत आढळले दारुचे दोनशे पव्वे

0
13

देवरी, दि. १७ : शहरातील राणी दुर्गावती चौकाला लागून असलेल्या चिचगड मार्गावरील दोन्ही बाजुला फुटपाथवर असलेले अतिक्रमण गुरूवारी (ता. १७) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाèयांनी हटविले.अतिक्रमण कारवाईदरम्यान वनविभाग कार्यालयासमोर असलेल्या पीर खॉ यांच्या पानठेल्यातून अंदाजे १५० ते २०० देशी दारुचे पव्वे पोलिसांनी हस्तगत केले.
सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाèया या गर्दीच्या ठिकाणी रस्त्याच्या दोन्ही कडेला अतिक्रमण वाढले होते. या अतिक्रमणामळे मुख्य रस्तेसुद्धा बंद झाली होती. ग्रामीण रुग्णालयात जाणारा मुख्य रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात होता. प्रशासनाने वारंवार सुचना देवूनही अतिक्रमण जैसे थे होते. अखेर गुरुवारी सार्वजनिक बांधका‘ विभागाच्या अधिकाèयांनी शेकडो पोलिसांची ‘दत घेऊन रस्त्यावरील अतिक्रमण हटाओ मोहीम राबविली. रस्त्याच्या माध्यापासून दोन्ही बाजूला १५ मिटरच्या आतील अतिक्रमण हटविण्यात आले. यात कित्येत दुकानाचे शेड तुटल्याने दुकानांचे चित्रच बदलून गेले तर फुटपाथवर असलेले पानठेले, दुकाने, फुटवेअर व हॉटेल हटविण्यात आले. वाढते अतिक्रमण पाहता, प्रशासनाने केलेल्या कारवाईमुळे फुटपाथ व्यवसायिकांमध्ये तिव्र संताप होता. या कारवाईत पक्षपात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर प्रशासनिक अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे अतिक्रमण कारवाईदरम्यान वनविभाग कार्यालयासमोर असलेल्या पीर खॉ यांच्या पानठेल्यातून अंदाजे १५० ते २०० देशी दारुचे पव्वे पोलिसांनी हस्तगत केले. दारुचे पव्वे आढळून आल्याने सारेचजण अवाक् झाले.