मातंग समाजाच्या मोर्चायवर लाठीहल्ला

0
7

नागपूर,दि.18-लोकस्वराज्य आंदोलना अंतर्गत मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणासाठी विधानभवनावर आज काढण्यात आलेल्या मोर्च्यावर पोलीसांनी लाठीहल्ला केला.मोर्च्याने उग्ररूप धारण केल्यामुळे पोलिसांनी मातंग समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचे पोलीसांचे म्हणने आहे. या घटनेत काही आंदोलनकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे. lathicharge

मातंग समाजाच्या आरक्षण वर्गीकरणासाठी ३ वाजून २० मिनीटाला २०० ते ३०० लोक असलेला मोर्चा श्रीमोहिनी कॉम्पलेक्स जवळ आला. त्या ठिकाणी मोर्च्यातील काही जणांनी बैरिकेट्स ओलांडण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांचे उग्ररूप पाहून त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी मारायला सुरुवात केली. त्यानंतर मोर्च्यातील लोकं भड़कले. आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली. त्यामुळे मोर्च्यावर पोलिसांनी जोरदार लाठीमार केला. आजु- बाजूच्या कॉम्पलेक्स मध्ये सुरक्षेसाठी घुसलेल्या आंदोलनकर्त्यांना बाहेर काढून पोलिसांनी मारले. यात जण जखमी झाले असून लाठ्यांचा मार अनेकांना बसलाय. मात्र, यात आणखी ही आंदोलनकर्ते जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर प्रचंड तणाव परिसरात निर्माण झाला होता. अवघ्या ३०० लोकांचा मोर्चा पोलीस सांभाळू शकले नाही ? असा सवाल निर्माण झाला असून यावर आणखी राजकारण तापण्याची शक्यता आहे.