शिक्षक भरतीच्या मागणीसाठी आमदारांचे धरणे

0
19

नागपूर,दि.18- महाराष्ट्रातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांतील शिक्षकांसह तुकडीला अनुदान मंजुर करण्यात यावे. तुकड्या तसेच कनिष्ठ महाविद्यालयास वेतनासाठी आर्थिक तरतूदीसोबत शिक्षक भरती सुरु करण्चाया मागणीला घेऊन शिक्षक आमदारांनी आज विधानभवनाच्या पायर्यावर आंदोलन केले. आंदोलनात शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करा, शिक्षकेतर कर्माचा-यांचा आकृतिबंध अहवाल मंजूर करा या आणि सोबतच इतर मागण्यांना घेऊन आमदार विक्रम काळे आमदार श्रीकांत देशपांडे, आमदार राजेंद्र नजरधने व आमदार भा. रा. तांबे यांनी विधानभवनाच्या पाया-यांवर धरणे आंदोलन केले. तसेच राज्यातील १४७ कनिष्ठ महाविद्यालयीन कर्माचा-यांचा वेतनाचा प्रश्न प्रलंबित असून या संबंधात वित्तमंत्री व सामाजिक न्यायमंत्री यांच्यासोबत बैठक घेण्यात यावी अशी मागणी दत्तात्रय सावंत यांनी मुख्यमंत्र्यांना केली.