मोठ्या अपघातातून परशुराकर व राठाेड बचावले

0
10

अर्जुनी मोरगाव , दि. १८ : अर्जुनी मोरगाव खरेदी विक्री स‘ितीची निवडणूक अंतिम टप्प्यात येवून पोहोचली. येत्या २० तारखेला मतदान आहे. प्रचाराकरिता प्राचार्य यशवंत परशुरा‘कर आणि विजयसिह राठोड गुरुवारी(१७) चारचाकी वाहनाने निघाले. दरम्यान झरपडा नजीक दुपारी दोन वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिली. श्री परशुरामकर आणि विजयसिह राठोड यांचे दैव बलवत्तर म्हणून वाहनाची मोठ्या प्रमाणात मोडतोड होवून देखील दोघानांही काहीही झाले नाही.
जिल्ह्यातील सर्वात मोठी खरेदी विक्री समिती म्हणून अर्जुनी येथील खरेदी विक्री समितीचा उल्लेख होतो. या समितीची निवडणूक दरवेळी चुरशीची असते. जिल्हा उपनिबंधकांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. विविध पॅनेलने आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले. आपापल्या परीने सर्वांचा प्रचार देखील जोमात सुरू आहे. रविवारी(ता.२०) मतदान घेण्यात येत आहे. त्यामुळे संचाक पदाच्या शर्यतीत असलेले उमदवार मतदारांशी थेट संपर्क साधत आहेत. प्राचार्य यशवंत परशुरामकर आणि विजय राठोड हे देखील मतदारांना भेटण्याकरिता  गुरुवारी कारने निघाले. वाहनात दोघेच होते. झरपडा येथून पुन्हा दुसèया गावी जात असताना भरधाव वेगात असलेल्या ट्रकने त्यांच्या कारला धडक दिली. यात कारची समोरील बाजूच्या साहित्याची पूर्णतः मोडतोड झाली. एवढा भीषण अपघात घडून देखील श्री परशुरामकर आणि श्री राठोड यांना कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही.