सुशासन दिनानिमित्त फळ वाटप

0
15

 

तिरोडा :  भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी बाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त भारत सरकारने ‘सुशासन दिन’ साजरे करायचे ठरविले. त्यानिमित्त स्थानिक ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळे व बिस्किटे यांचे वितरण आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते, माजी आ. हरिष मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिक्षक डॉ.एच.एन. मेश्राम, संदीप बघेले, स्वानंद पारधी, कृउबासचे मुख्य प्रशासक डॉ. चिंतामन रहांगडाले, भाजपा महामंत्री खडकसिंग जगने, उमा हारोडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष डी.आर. गिरीपुंजे, शुक्राचार्य ठाकरे, डॉ. सचिन, भाजप कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी अद्यावत सुख-सुविधांनी हे रुग्णालय सज्ज झाले पाहिजे. आवश्यक डॉक्टर लवकरच येथे आणले जातील असे आ. विजय रहांगडाले यांनी सांगितले. डॉ.एच.एन. मेश्राम यांनी आपल्या प्रास्ताविकातून रुग्णालयाचा विकास कसा होऊ शकतो हे सांगून डीजीटल एक्स-रे मशिन यंत्र आवश्यक असल्याचे सांगितले. संचालन डॉ. सचिन यांनी तर आभार स्वानंद पारधी यांनी मानले.