डेप्युटी सीईओ पुराम भंडारा बीडीओ,तर मंजुषा भेदे नव्या डेप्युटी सीईओ

0
5

गोंदिया,दि.28-गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार पुराम यांची प्रशासनाने अखेर भंडारा पंचायत समितीचे बीडीओ म्हणून बदली केली आहे.पुराम यांच्या जागेवर भंडारा पंचायत समितीच्या बीडीओ मंजुषा भेदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.विशेष म्हणजे श्रीमती भेदे यापुर्वी देवरी महिला बालकल्याण विभागा्च्या प्रमुख राहिलेल्या आहेत.तर पंचायत विभागाचे उपमुुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून राजेश बागडे यांची बदली करण्यात आली आहे.बागडे यापुर्वी आमगाव पंचायत समिती तसेच लाखनी पंचायत समितीचे बीडीओ राहिले आहेत.

पुराम हे गोंदियात विविध विषयावर वादग्रस्त राहिले.गेल्या जि.प.पदाधिकारी कायर्काळात त्यांच्याविरुध्द अनेक जि.प.सदस्यांनी आवाज उठविला होता.त्यातच तत्कालीन जि.प.अध्यक्षांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे त्यांची तक्रारही केली होती.कर्मचारी पदोन्नती प्रकरणातही त्यांनी मनमर्जीने पदोन्नती केल्याचे अन्यायग्रस्त कर्मचारीनी म्हटले होते.तर पंचायत विभागाच्या एका कर्मचायाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी मानसिक दबावतंत्राचा वापर केल्याची चर्चा होती.प्रशासकीय कामात मो्ठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करण्याचे काम त्यांच्या कार्यकाळात झाले आहे.पुराम यांच्या बदलीचे आदेश ग्रामविकास मंत्रालयाने आज जारी करताच कर्मचारी व काही अधिकारी वर्गात आनंदाचे वातावरण होते.