१६८ रूग्णांनी घेतला शिबिराचा लाभ

0
10

तिरोडा दि.1: अदानी फाऊंडेशनच्यावतीने हेल्पेज इंडिया आणि महात्मे आय बँक यांच्या सहयोगाने ग्राम गराडा येथील ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी घेण्यात आलेल्या नेत्र तपासणी मोतिबिंद शस्त्रक्रीया शिबिराचा १६८ रूग्णांनी लाभ घेतला.
या शिबिराच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच वेणु फटींग, ग्रामपंचायत सदस्य सुनील उके, सेवानवृत्त शिक्षक समाजसेवक केवलदास फटींग, अदानी फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक सुबोधकुमार सिंग, प्रकल्प अधिकारी स्वप्नील वाहने, हेल्पेज इंडिया मेडीकल मोबाईल व्हॅन समन्वयक सुनील निमजे तसेच महात्मे आय बँकचे नेत्रतज्ञ डॉ. स्मिता पेठे, डॉ.अरविंद डोंगरवार, सतिश बोरघाटे, शैलेश बागडे, काजल शेंडे, अंकिता बागडे व शकील शेख आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी फटींग यांनी, डॉक्टर हे अंधांकरिता दीपक प्रदान करीत असल्याचे सांगून अदानी फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले. उपसरपंच फटींग यांनी, अदानी फाऊंडेशन खुप मोलाचे कार्यकरीत असून गावातील प्रत्येकांनी आपल्या डोळय़ांचा काही त्रास असल्यास शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या शिबिरात एकूण १६८ रुग्णांनी आपली नेत्र तपासणी केली. यापैकी ४७ रुग्णांमध्ये मोतीबिंद असल्याचे निदान लागले. यातील १७ रुग्ण ऑपरेशनकरिता महात्मे आय बँक येथे पाठविण्यात आले. उर्वरित रुग्णांना दुसर्‍या टप्यात ऑपरेशन करीता पाठविण्यात येणार आहेत.संचालन प्रकल्प अधिकारी कैलास रेवतकर यांनी केले