किसान सभेचा कृषी कार्यालयावर मोर्चा

0
10

गोरेगाव दि.1: तालुका कृषी अधिकारी, कृषी सहायक व कृषी मित्र यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य किसान सभा तालुका कौन्सिलच्यावतीने ३0डिसेंबर रोजी तालुका कृषी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तालुका कृषी अधिकारी मार्फत खोसेटोला या गावात शेतकर्‍यांना मोफत २२ क्विंटल चना बियाणे वाटप करावयाचे होते. परंतु तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक व कृषी मित्र यांनी संगनमत करुन शेतकर्‍यांकडून प्रतिकिलो ४0 रुपये प्रमाणे बियाण्यांसाठी पैसे घेतले.गावातील शेतकर्‍यांनी जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा अधिकारी, आमदार, तसेच मंत्र्यांना लेखी तक्रार केली तरी शासकीय यंत्रणांनी लक्ष दिले नाही. करिता मोर्चा काढून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नावाने तालुका अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व हौसलाल रहांगडाले, रामचंद्र पाटील, चरणदास भावे, सेवकराम पारधी, लालचंद ठाकुर, मानिकचंद बिसेन, रुमनलाल रहांगडाले, किसनलाल रहांगडाले, माजी सरपंच शशीकला पारधी यांनी केले.