जग समृद्ध करणार्‍या मराठी माणसाला राज्याचे दालन सदैव खुले

0
11

अमरावती : जगात मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रात यशाची पताका फडकवित आहे. अनेक देशांमध्ये विविध क्षेत्रांत मराठी माणसांचे यश आपल्याला मराठीपणाचा अभिमान देत आहे. जग समृद्ध करणार्‍या मराठी माणसाला राज्यात विविध क्षेत्रांत काम करण्याची संधी आहे. राज्याची ही दालने जगातल्या मराठी माणसासाठी सदैव खुली आहेत. त्यामुळे भविष्यात निश्‍चितच राज्य अशा व्यक्तिमत्वांच्या सहकार्याने समृद्ध होईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.
अमरावतीत संत ज्ञानेश्‍वर सांस्कृतिक भवनात जागतिक मराठी अकादमीच्यावतीने ‘शोध मराठी मनाचा’ संमेलन २0१६ च्या उद््घाटनाप्रसंगी ते बोलत होते. हे संमेलन अमरावतीकरांसाठी पर्वणी असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, अशा संमेलनांमधून तळागाळातून पुढे आलेल्या व्यक्तिमत्त्वांचे विचार उलगडतात. युवा पिढीने या संधीचा अवश्य लाभ घेतला पाहिजे. समाजात एकेका क्षेत्रात काम करणार्‍या व्यक्तींच्या भरवश्यावर देश चालत असतो. अशा व्यक्तिमत्वांचा उलगडा संमेलनांच्या माध्यमातून होत असतो. तळागाळातील लोकांमध्ये अनेक सुप्त गुण असतात, त्यांना वाव मिळत नाही. अशा व्यक्तींमधील गुणांचा शोध घेऊन त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम शासन करीत आहे. विशेष अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, स्वागताध्यपदी अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, खा.आनंदराव अडसूळ, महापौर चरणजितकौर नंदा, गिरीश गांधी, आदी उपस्थित होते.