तिगाव प्राथ.आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने केली मारहाण

0
19

गोंदिया,दि.२-जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातंर्गत येत असलेल्या आमगाव तालुक्यातील तिगांव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी,कर्मचारी व वाहनचालकाने मिळून आरोग्य केंद्रातीलच परिचारिकेच्या मुलाला जबर मारहाण केल्याची घटना शुक्रवारच्या रात्री घडली.सदर प्रकरणामुळे तिगाव येथेच नव्हे तर आरोग्य विभागात ख‹ळबळ माजली आहे.घटनेची दखल घेत आमदार संजय पुराम यांनी सुध्दा घटनास्थळ गाठले.तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी वैद्यकीय अधिकारी यांना २४ तासाच्या आत स्पष्टीकरण देण्यासंबधीचे पत्र देण्याचे निर्देश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिले आहे.याप्रकरणात आमगाव पोलिसांना थापडबुक्यांनी मारहाण केल्याप्रकरणाची तक्रार नोंद करून घेतली आहे.तक्रारदार जितेंद्र हुकरे याने वैद्यकीय अधिकारी डॉ.महेंद्र मडावी व शिवणकर यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार नोंदवली आहे.गावात असलेल्या चर्चेनुसार रात्रीला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात वैद्यकीय अधिकारी ,वाहनचालक व इतर एक कर्मचारी असे तिघेही शासकीय आवारात दारूचे सेवन करीत असतानाच जितेंद्र हुकरे सोबंत बाचाबाची झाली.बाचाबाचीचे रूपांतर मारहाणीपर्यंत गेले.या तिघांनी मिळून जितेंद्रला चांगलेच मारल्याची चर्चा आहे.