भुराटोला लघु प्रकल्पाच्या बंदनालिका वितरण प्रणालीचे आ.रहांगडाले यांच्या हस्ते भूमिपूजन

0
32

 – ४ गावातील ४८९ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार.
तिरोडा:- विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर अंतर्गत तिरोडा तालुक्यातील भुराटोला चंदन तलाव येथे या तलावाची सिंचन क्षमता ४८९ हेक्टर असून उजवा कालवा २.८५ कि.मी.व डावा कालवा १.८५ कि.मी.असून एकूण ४.७ किमी कालव्याद्वारे जमिनीपासून १.२ मीटर आता बंद नलिकेतून शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहोचणार आहे या कामाकरिता आमदार विजय रहांगडाले यांच्या माध्यमातून सन २०१८ मध्ये २१.५० कोटी रुपये सुधारित प्रशासकिय मान्यता प्राप्त झालेली असून घळभरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आलेली होती या कामाकरिता लाभाक्षेत्रातील चार गावातील खाजगी व सरकारी जमीन मिळून एकूण ९३.८७ हेक्टर जमीन संपादित करण्यात आलेली आहे. भूराटोला, पालडोंगरी, करटीखुर्द व करटी बूज. या गावांतील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. या लघु प्रकल्प धरण,सांडवा व पुच्छ कालवा,उजवा व डावा मुख्य विमोचकचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्प पाणीसाठा १.७३ द.ल.घ.मी.पूर्ण क्षमतेचे निर्मित झालेला असून जून २०२२ पर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होणार आहे.या प्रकल्पाचा १०० टक्के खरीप पिक व १५ टक्के रबी पिकांना फायदा होणार असून सद्या ९.०० कोटी रुपयाची कामे सुरु होणार आहेत. आमदार विजय रहांगडाले यांनी तिरोडा तालुक्यात धापेवाडा उपसा सिंचन प्रकल्प टप्पा १, २, निमगाव आंबेनाला मध्यम प्रकल्प, तसेच भूराटोला लघु प्रकल्प मार्गी लावल्याने तिरोडा गोरेगाव विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करण्यावर विशेष भर दिला असून धापेवाडा टप्पा २ चरण तीन अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील गुमडोह तलावात सोडून गोरेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध करण्याबाबत प्रयत्नशील आहेत सदर कामाचे भूमिपूजन आ.रहांगडाले यांच्या शुभहस्ते संपन्न झाले असून कार्यक्रमाप्रसंगी जी.प.सदस्य पवन पटले, माजी उपाध्यक्ष मदन पटले,माजी उपसभापती वसंत भगत भाजप तालुकाध्यक्ष भाऊराव कठाणे, प.स. सदस्य हुपराज जमाइवार,ज्योती शरणागत,सुनंदा पटले, कुंता रामप्रकाश पटले, सरपंच चंद्रकुमार चौधरी, तिलोतम्मा चौरे,संगीता पुराम, वर्षा मालाधरे, कृउबास संचालक घनश्याम पारधी, भाजप कोषाध्यक्ष डॉ.रामप्रकाश पटले,डीलेश पारधी,डॉ.आनंद पटले, जयकुमार रीनाईत, संजय गुनेरीया, महादेव कटनकार, व लाभक्षेत्रातील शेतकरी, व उपसा सिंचन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.