सरपंचाच्या आशीर्वादाने रेल्वे कर्मचाèयाचे अतिक्रमण-बावणकर

0
17

गोंदिया : दि.६-तालुक्यातील दांडेगाव येथील जनावरे चारण्याच्या तसेच थांबविण्याच्या जागेवर सिमेंटचे पक्के बांधकाम करून घर बांधण्यास दांडेगावच्या सरपंचाने रेल्वे कर्मचाèयाला पाठबळ दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमणाच्या तक्रारीवर तहसीलदाराला दिलेल्या साक्षीमध्ये सरपंचाने रेल्वे कर्मचाèयाचे अतिक्रमण हटविल्यास ४० वर्षापूर्वीचे असलेले अतिक्रमण ही हटविण्यात यावे अशी भूमिका घेत रेल्वे कर्मचाèयाच्या अतिक्रमणाला पाqठबा दिला आहे.
दांडेगाव येथील ग्राम पंचायत सदस्य हिरामन बावणकर यांनी नागरिकांच्या आग्रहाखातर शासकीय जागा असलेल्या गट क्रमांक ७२७ वर रेल्वेमध्ये दांडेगाव चौकीवर कार्यरत असलेला इंग्लीशकुमार यादव या शासकीय कर्मचाèयाने केलेल्या अतिक्रमणाची तक्रार दांडेगाव ग्राम पंचायतचे सरपंच सुरेश पटले व सचिवांना जानेवारी २०१५ मध्ये केली होती. परंतु त्या तक्रारीवर ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत थातुर-मातुर उत्तर देऊन प्रकरण दाबण्याचेच प्रयत्न केले. ग्राम पंचायतीने तक्रारीकडे लक्ष न दिल्याने आणि ज्या जागेवर अतिक्रमण करून घर बनविण्यात आले ती जागा जनावरे थांबविण्यासाठीची असल्याने जनहिताचे काम समजून बावणकर यांनी तहसीलदाराकडे तक्रार दाखल केली. आज त्या जागेवर घर तयार करण्यात आल्याने रेल्वे फाटक जेव्हा बंद असते तेव्हा जनावरांना थांबविण्यासाठी अडचण निर्माण होऊ लागली आहे. गावातील सर्वांचीच जनावरे त्या जागेवर थांबत असतानाही सरपंचाने शासकीय कर्मचाèयाला अतिक्रमण करण्यास का सहकार्य केले हे गावकèयांनाही कळेनासे झाले आहे. विशेष म्हणजे या अतिक्रमण संदर्भात तहसीलदार संजय पवार यांनी सरपंच सुरेश पटले व सचिव सोनेवाने यांना बयान नोंदविण्यासाठी बोलविले असता त्यावेळी इंग्लीशकुमार यादव याचे अतिक्रमण न हटविता पूर्ण गावातीलच हटवू असे सांगितले. मात्र गेल्या तीन वर्षांपासून पटले हे सरपंच पदावर असतानाही त्यांनी गावातील अतिक्रमण हटविण्यासंदर्भात कधीही ग्राम पंचायतीच्या मासिक सभेत ठराव घेतला नाही, असेही बावणकर यांनी सांगितले आहे.