सामाजिक चारित्र्याचा सूर्यास्त जवळ आला आहे-डॉ.अभय बंग

0
15

गडचिरोली, दि.६ : : जेव्हा खुज्या माणसांच्या सावल्या लांब पडतात, तेव्हा सूर्यास्ताची वेळ जवळ आलेली असते, असे युरोपचा इतिहास लिहिणाऱ्या कार्लाइनने सांगून ठेवले. हीच स्थिती भारतातही दिसू लागली असून, सामाजिक चारित्र्याचा सूर्यास्त जवळ आला आहे, अशी खंत ख्यातनाम समाजसेवक “महाराष्ट्र भूषण” डॉ.अभय बंग यांनी व्यक्त केली.

गडचिरोली प्रेसक्लबतर्फे आज पत्रकार दिनानिमित्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी आमदार हिरामण वरखडे यांना डॉ.अभय बंग यांच्या हस्ते “गडचिरोली गौरव” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुख्य अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत वानखेडे, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एन.व्ही.कल्याणकर, प्रसिद्ध साहित्यिक डॉ.प्रमोद मुनघाटे, हिरामण वरखडे, सौ.मीनाताई वरखडे उपस्थित होते. प्रेसक्लबचे अध्यक्ष विलास दशमुखे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

यावेळी कुलगुरु डॉ.कल्याणकर, प्रेसक्लबचे अध्यक्ष विलास दशमुखे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे संचालन जयन्त निमगडे, प्रास्ताविक अरविंदकुमार खोब्रागडे, तर आभार प्रदर्शन अनिल धामोडे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी हेमंत डोर्लीकर, रोहिदास राऊत, मारोती मेश्राम, अविनाश भांडेकर, सुरेश पद्मशाली, नंदकिशोर काथवटे, सुरेश नगराळे, सुरेश सरोदे, बबलू पठाण आदींनी सहकार्य केले.