प्रशिक्षित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
10

अमरावती दि.९तरुण लोकसंख्या ही भारताची शक्ती असून अभियांत्रिकी क्षेत्राने प्रशिक्षित मनुष्यबळाच्या निर्मितीसाठी उत्कृष्टतेचा ध्यास घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या प्रांगणात आयोजित 45 व्या आयएसटीईच्या राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले तेव्हा ते बोलत होते.

डेमोक्रसी (लोकशाही), डेमोग्राफी (लोकसंख्या) आणि डिमांड (मागणी) ह्या तीन ‘डी’ भारताच्या शक्ती आहे. उच्च व तांत्रिक शिक्षण क्षेत्रात या तीन ‘डी’ च्या सहाय्याने उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन प्रशिक्षित मनुष्यबळ तयार केले तर 2020 मध्ये भारत महासत्ता असेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे, खासदार आनंदराव अडसूळ, आयएसटीई दिल्लीचे अध्यक्ष डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे, नागपूर विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.एस.पी.काणे, अमरावती विद्यापिठाचे कुलगुरु डॉ.मोहन खेडकर, आयएसटीईचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह देसाई, व्हि.एन.आय.टी नागपूरचे अध्यक्ष डॉ. विश्राम जामदार, डॉ. सागर देशपांडे, प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, ॲड.कृष्णराव देशपांडे अध्यक्ष ह.व्या.प्र.मंडळ, श्रीकांत चेंडके, माधुरी चेंडके, सागर देशपांडे, डॉ.इसामु कोयामा (जपान), डॉ.सीराम रामकृष्णा, हितोशी सातो (जपान) व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ मंडळी उपस्थित होते.

महाराष्ट्रात शासन एस.सी., एस.टी.च्या विद्यार्थ्यांची 100 टक्के तर ओ.बी.सी. च्या विद्यार्थ्यांची 50 टक्के शुल्क भरते. परंतु राज्यातील काही महाविद्यालय केवळ याच प्रवर्गातील जागा भरतात. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देत नाही हे चित्र बदलावे. महाविद्यालयाच्या मुल्यांकनाची शासनाकडे असलेली प्रक्रिया अधिक गतिशील, परिणामकारक व कुशलतेकडे नेण्याची गरज आहे. आपल्या राज्यातील लोकांना मनुष्यबळात विकसित करणे हे अतिशय गरजेचे आहे त्याकरिता चॉईस बेस्ड क्रेडिट पॉलिसीचा अवलंब करावा.

 यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आयएसटीई इंटरनॅशनल फेलोशिप प्राप्त केल्याबद्दल सीराम कृष्णन (सिंगापूर), डॉ.राजेंद्र गोडे इंजिनिअर इंस्टिट्यूटचे डॉ.विजय इंगोले यांना आयएसटीई फेलोशिप प्राप्त केल्याबद्दल, उच्च व तंत्र शिक्षणाचे संचालक डॉ.सुभाष महाजन यांना बेस्ट ॲडमिनिस्ट्रेटर पुरस्कार मिळाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.