राज्य अधिस्वीकृती समितीच्या बैठकीला नागपूर येथे सुरुवात

0
19

नागपूर दि.९महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र व प्रसार माध्यम अधिस्वीकृती समितीची बैठक समितीचे अध्यक्ष यदु जोशी यांच्या अध्यक्षतेखाली सुरु असून उद्या 10 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

रविभवन येथील सभागृहात आयोजित या बैठकीला राज्य अधिस्विकृतीचे सदस्य, विविध विभागाचे संचालक व उपसंचालक उपस्थित आहेत. बैठकीच्या प्रारंभी महाराष्ट्र भूषण कविवर्य मंगेश पाडगांवकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर अध्यक्षांचे स्वागत समितीचे सदस्य सचिव तथा वृत्त विभागाचे संचालक शिवाजी मानकर यांनी शाल, पुष्पगुच्छ व वर्धादर्शन कॉफीटेबल बुक देऊन केले. राज्य समितीचे अध्यक्ष यदु जोशी हे नागपूरचे असल्यामुळे त्यांनी सर्व सदस्य व उपस्थित अधिकाऱ्यांचे शाल, पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीच्या पहिल्या दिवशी राज्यातील मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, अमरावती, औंरगाबाद, लातूर, कोल्हापूर या विभागातून आलेल्या अधिस्विकृती अर्जांवर चर्चा करुन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. प्रारंभी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक मोहन राठोड यांनी सर्वांचे स्वागत करुन नागपूरच्या वैशिष्ट्याबद्दल माहिती दिली.

यावेळी राज्य अधिस्विकृती समितीचे सदस्य सर्वश्री धनंजय जाधव, कृष्णा शेवडीकर, प्रकाश कुलथे, विनोद जगदाळे, लक्ष्मीदास इनामदार, उन्मेष पवार, मधु कांबळे, रवींद्र बेडकिहाळ, संजय तिवारी, नंदकुमार सुतार, प्रसाद काथे, चंद्रकांत शिंदे, श्रीमती क्लारा लेवीस, श्रीमती पूजा शाह, तर मराठवाडा विभागाचे संचालक राधाकृष्ण मुळी, पुणे विभागाचे उपसंचालक यशवंत भंडारे, कोकण विभागाचे उपसंचालक अनिरुध्द अष्टपुत्रे, मुंबईचे उपसंचालक(वृत्त) ज्ञानोबा इगवे, नाशिकचे जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे, कोल्हापूर विभागाचे सखाराम माने आदी उपस्थित आहेत.