सेवासंलग्नतेच्या भितीनेच ५७ वर्षीय अव्वल कारकूनाला गमवावे लागले प्राण

0
142

जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसलेल्याच्या पाठिशी महसुल संघटना व जिल्हाधिकारी कार्यालय

गोंदिया,दि.27:-जिल्हाधिकारी कार्यालयाने नियम धाब्यावर बसवून सेवानिवृत्तीला एक वर्ष असलेल्या आमगाव तहसील कार्यालयात कार्यरत असणार्या एका ५७ वर्षीय लिपिकाची बदली(सेवासलंग्नता)देवरीच्या उपविभागीय कार्यालयात करण्याच्या हालचाली सुरु झाल्यांने संबधित कर्मचारी मानसिक तणावाखाली आला.बदल्यांचा हंगाम मे मध्ये सुुरु होतो,त्यापुर्वीच तयारी केली जाते.त्यासंदर्भाने बदली प्रकियेतंर्गत सदर लिपिकाने आपली बदली करण्यात येऊ नये अशी विनंती आमगावच्या तहसीलदाराना १७ फेबुवारी २०२२ रोजी केली होती.परंतु त्याच्या अर्जावर प्रशासनाने लक्ष न दिल्याने अर्जदार कर्मचारी यू.बी.पंधरे हे चांगलेच तणावात आले,यातच त्यांची प्रकृती खालावली आणि बदली थांबविण्यासाठी दिलेल्या अर्जाच्या 28 दिवसानींच या तणावामुळे त्यांना आपले प्राण गमवावे लागले.
एकीकडे आमगाव,गोंदिया,देवरी तहसिल व उपविभागीय अधिकारी कार्यालयातील कर्मचारी नोकरीच्या पहिल्या दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसलेले असतांना त्यांना त्यांच्या मूळ जागेवर परत पाठविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बसून बदली करणारे अधिकारी मात्र आंधळे होऊन बसतात अशा या अधिकार्यामुळे आधीच इतर कामाचा बोझा घेऊन काम करीत असलेले अनेक कर्मचारी कार्यरत आहेत.त्यांना दिलासा देण्याएैवजी त्यांच्यावरच अतिरिक्त कामाचा ताण व बदलीचा ससेमिरा लावून पारदर्शक कार्यप्रप्रणालीच्या नावावरच भ्रष्टप्रणालीचा कारभार लावण्यात आले असे म्हणने वावगे होणार नाही.
पंधरे या कर्मचार्याला आपली देवरी येथे सेवा सलंग्न करण्यात येत असल्याचे कळल्यानंतर आणि अर्ज करुनही काहीही सहकार्य होत नसल्याच्या विचारामुळे परिणामी अखेर शॉक बसून हा अर्जदार गतप्राण झाला.काहीवर्षापुर्वी गोंदिया जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागातील एक कर्मचारी सुध्दा अशाच तणावात मृत पावलेला होता.आता महसुल विभागातही अशी परिस्थिती निर्माण करण्यात आली की काय अशी म्हणण्याची वेळ आली आहे. अर्जदाराच्या मरेपर्यन्त वाट बघणारे महसूल विभागाचे अधिकारी किती मगरगट्ट आणि बेजबाबदार आहेत याची जनमानसात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की,अर्जदार यू. बी. पंधरे हा आमगावच्या तहसील कार्यालयात अव्वल कारकून होता. दरम्यान सेवानिवृत्तीला एक वर्ष शिल्लक असताना त्याची सेवा सलग्ंनता देवरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात करण्यात येत असल्याचे त्यांना कळले.त्यानंतर त्यांनी विनंती अर्ज करुन आपणास आमगाव तहसिल कार्यालयातून कार्यमुक्त करण्यात येऊ नये असे म्हटले.सोबतच आपले प्रकृतीही साथ देत नसल्याचे सांगत कोवीड काळात आजारी पडल्याचेही पत्रात म्हटले होते.                                                                                                          त्या पत्रावर प्रशासनाने लक्ष दिले की नाही हा भाग वेगळा असला तरी जिल्ह्यातील महसुल संघटना ही फक्त नावापुरती असून त्या कर्मचार्याला न्याय देऊ शकली नाही.उलट एकाच ठिकाणी प्रतिनियुक्ती व सेवा सलंग्नतेवर दशकानुदशक नोकरी करीत असलेल्यांच्या रक्षणासाठीच तयार झाल्याने आजच्या घडीला तालुकापातळीवरील अनेक कर्मचार्याना या सेवा संलग्न कर्मचार्ङ्मामुळे मानसिक तणावात काम करण्याची वेळ या संघटनेमुळेच झाली की काय अशी म्हणायची वेळ आली आहे.त्यातच मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या पदांचाही ताण अतिरिक्त कारभार सांभाळत असलेल्या कर्मचार्यावर होऊ लागल्याने महसुल विभागात सेवासंलग्नतेच्या नावावर एकाच ठिकाणी वर्षोनवर्ष बसलेल्यांना मूळजागेसह इतर तालुक्यात हलवण्याची गरज निर्माण झाली आहे.